कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? धिक्कार असोवि.दा.सावरकर कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि राष्ट्रज्योती सावित्री फुले यांचे पुतळे हटविले

मावळ मराठा न्यूज:-आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मदिनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात तिथे पूर्वीपासून असलेल्या अहिल्यादेवी होळकर व सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हटवून सावरकर यांचा पुतळा तिथून अधिक उंचीवर ठेवण्यात आलाय.पुतळे कार्यक्रमापुरते हटविण्यात आले म्हणले, तरी त्याची गरज काय? स्वातंत्र्यापूर्वी अहिल्यादेवी होळकर आणि नंतर सावित्री माई फुले यांचे योगदान मोठे आहे, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. वाट्याला येईल त्या हाल-अपेष्टा, कष्ट सोसून त्या लढत राहिल्या. त्यांचे समर्पण आणि योगदान इतर कुणाही पेक्षा जास्त आहे. मात्र, पुतळे हटवून तुम्ही त्यांचे अस्तित्व नाकारताय आणि यातून मानसिकता व विचारसरणी कोणती आहे, ते स्पष्ट होतेय. एकाचं मोठेपण सांगताना दुसऱ्यांना कमी दाखवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. इतिहास चाळला तरी या दोघी इतर पेक्षा कधीही श्रेष्ठ ठरतात! इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. दिल्लीच्या तालावरील तुमचा नाच आणि दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अभिमानाच्या व्यक्तिमत्त्वांचा तुम्ही केलेला अवमान इतिहासात नोंद केला जाईल. तुमचे अस्तित्त्व उद्या पुसले जाईल, पण अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई यांचे योगदान व समर्पण इतिहासात अजरामरच राहील.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page