लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळ्याला वार्षिक पुरस्कार सोहळ्यात पाच पुरस्कार









मावळ मराठा न्युज -पुणे,डिस्ट्रिक्ट ३२३४-डी२ च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध उपक्रमांसाठी एकूण पाच मानाचे पुरस्कार पटकावले.क्लबने सामाजिक सेवा, जनहिताचे उपक्रम, संघटनात्मक कार्य आणि लायनिझमच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.या यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष ला कांता ओसवाल सचिव ला निराली नालेकर व खजिनदार ला अश्विनी कदम ,पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच सर्व लायन सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. क्लबला पहला अवार्ड बेस्ट लायन्स क्लब चा बेनर पॅच देऊन संन्मान करण्यात आला. दुसरा बेनर पॅच सर्विस अवार्ड दिला. तीसरा बेस्ट ह्युमनिटी अवार्ड क्लबला ट्रॉफी देण्यात आली. बेस्ट झोन चेअरमन आणि बेस्ट कॅबिनेट ऑफीसर असे पाच अवार्ड मिळाले.या पुरस्कारांमुळे लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळ्याच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही क्लब सामाजिक सेवेसाठी अधिक उत्साहाने कार्यरत राहील.लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा — “We Serve” या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य!



