ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मदन पवार माजी कस्टम अधिकारी,मुंबई यांनी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल राज्यस्तरीय ‘ बापमाणूस ‘ या पुरस्काराने सन्मानित



मावळ मराठा न्युज- पुणे,जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या जगदीशब्द फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा सोहळा रविवारी पुण्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मदन पवार से.नि.कस्टम ऑफिसर मुंबई यांनी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल राज्यस्तरीय ‘ बापमाणूस ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. बाबा आढाव, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे, से.नि. आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विचारवंत प्रा. नितीन तळपाडे, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या ३० व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.




