स्व. ॲड. शंकरराव दामोदर भोंडे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सक्षम मानकर व संस्कृती कालेकर प्रथम
मावळ मराठा न्यूज़ ,लोणावळा येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये आज पार पडलेल्या स्व. ॲड. शंकरराव दामोदर भोंडे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी च्या गटात ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलचा विद्यार्थी सक्षम संजय मानकर याने प्रथम क्रमांक मिळविला तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात व्हि.पी.एस हायस्कूलची विद्यार्थीनी संस्कृती सुधीर कालेकर हीने प्रथम क्रमांक मिळविला.गट निहाय निकाल खालीलप्रमाणे :-इयत्ता पाचवी ते सातवी गट सक्षम संजय मानकर (प्रथम- ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा), पार्थवी राजु पाटील (द्वितीय – सिंहगड पब्लिक स्कूल कुसगाव), श्रेयश विजय गायकवाड (तृतीय डॉन – बॉस्को हायस्कूल लोणावळा), सानवी किरण डुंबरे (उत्तेजनार्थ जैन इंग्लिश स्कूल कामशेत), आर्या संतोष जगताप (उत्तेजनार्थ श्री एकवीरा विद्या मंदिर – कार्ला).इयत्ता आठवी ते दहावी गट : संस्कृती सुधीर कालेकर (प्रथम व्हि. पी. एस हायस्कूल लोणावळा), संजना विनोद दळवी (द्वितीय ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा), इंदिरा संतोष गुंजाळ (तृतीय – आण्णासाहेब चौबे हायस्कूल तळेगाव), श्रद्धा दशरथ पिंगळे (उत्तेजनार्थ- नाणे माध्यमिक विद्यालय नाणे) या स्पर्धेचे परिक्षक म्हणून संजय पुजारी, आनंद नाईक व संजीव वीर यांनी काम पाहिले. स्पर्धेकरिता मुख्यध्यापिका माध्यमिक विभाग माधवी थत्ते, मुख्यध्यापिका पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग अंजूम शेख, माध्यमिक विभाग उपमुख्यध्यापिका तृप्ती गव्हले, उपमुख्यध्यापिका प्राथमिक विभाग स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका शशिकला तिकोणे, विश्वस्त राजाभाऊ खळदकर, अरविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.