वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांच्या मुळे वाचले महीलेचे प्राण


मावळ मराठा न्यूज़:- मावळ, (ॲड.गणेश जगताप ) आज दिनांक ६ जुलाई रोजी मध्यरात्रि २ :२० च्या सुमारास मुरहे यांच्या भाडेकरू च्या रूम मध्ये बेड वर वर झोपलेल्या लेडीजच्या अंगावरून साप गेल्याचा फोन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना आला ते लगेच तिथे जाऊन पाहिले तर तो नाग होता सुरक्षित पकडून सोडून दिला,नशीब त्या लेडीज ला चावला नाही. त्यांना हाताला मऊ काहीतरी लागल्याची चाहुल झाल्याने त्यांच्या पती ला उठवले व मालकाला सांगितले त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना फोन केला. त्यांनी कसलाही विचार न करता लगेच त्या ठीकाणी जाऊन तो साप पकडला तो साप विषारी नाग होता लगेच साप पकडून वन विभागाच्या जागेत सोडुन दिला जर ते गेले नसते तर त्या महिलेचा जीव गेला असता त्यामुळे गायकवाड़ यांचे वर अभिनन्दनाचा वर्षाव होत आहे .




