औद्योगिक प्रशिक्षण संस्था ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

मावळ मराठा न्यूज़ :-आकुर्डी , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड या संस्थेमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दहावी पास, नापास इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी *www.admission.dvet.gov.in* या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य माननीय श्री शशिकांत साबळे यांनी केले आहे. एका विद्यार्थ्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून कोठेही एकच अर्ज भरता येणार आहे याची नोंद घ्यावी. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व मूळ कागदपत्रे घेऊन आपल्या नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन प्रवेश अर्ज निश्चित करावयाचा आहे. त्यानंतरच व्यवसाय निवडीसाठी विकल्प सादर करता येतील. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया दरम्यान संस्थेत प्रवेशा संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी असणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे या संस्थेत एकूण १४ व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. नळ कारागीर ( ७२), पत्रे कारागीर ( ६०), संधाता (१००), आरेखक यांत्रिकी (२०), वीजतंत्री (२०), जोडारी (४०), यंत्र कारागीर ( २०) यंत्र कारागीर घर्षक (२०), कातारी ( २०) आणि फळे भाज्यावर संस्करण (२४) याप्रमाणे व्यवसाय निहाय जागा उपलब्ध आहेत.सध्याच्या परिस्थितीत कौशल्य प्राप्त उमेदवारांना रोजगार मिळण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आहे. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी तसेच दोन वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इंजीनियरिंग पदविका अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच आय.टी.आय.प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणार्या विद्या वेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.त्यामुळे आयटीआय येथे प्रवेश घेऊन आपले भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री शशिकांत साबळे यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page