लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी २० किलो गांजा सह साढ़े सहा लाखाचा माल जप्त

मावळ मराठा न्यूज़ ,लोणावळा:- लोनावला ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने संकल्प नशा मुक्ति अभियाना अंतर्गत अवैद्य दारु वाहतूक ,घुटका विक्री ,गांजा वाहतूक व् विक्री बाबत अनेक केसेस केलेल्या आहेत.त्यात गांजाचे सेवन करणारी ४ ,अवैध घुटका वाहतूक करणारा १ ,यात गुटखा व् वाहन मिळून ७ लाखाचा मुद्देमाल जप्त ,तर दारुबंदी कायद्याखाली २७ जणांवर गुन्हे दाखल करुन ३ लाखाचा देशी विदेशी आणि गावठी दारू जप्त केलि आहे.आणि आता दिनांक ११ जुलाई रोजी छोटा हत्ती टेम्पो गाड़ी क्रमांक एम् एच ४८ सी बी १८२८ यातून मुंबई कडून पुणे बाजूकडे अशी वाहतूक होत आहे अशी माहिती पोलिस अमलदार केतन तलपे यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे छापा साठी वरिश्ठाना कळवून त्यांच्या परवानगी ने वरसोली येथे मोठ्या शिथापिने सदर टेम्पो पकडण्यात आला.यात अशोक भुजंग चव्हाण वय ४३ ,राहणार धमनी,खालापुर आणि शंकर भगवान सालुंखे वय ३०,राहणार ठोम्बरे वाडी,लोनावला यांचेसह सदर टेम्पोची झड़ती घेतली असता २० किलो बिया बोंडा सह हिरवट कालसर तपकिरी रंगाचा ओलसर हा अमली पदार्थ आणि टेम्पो असा साढ़े सहा लाखाचा माल जप्त करण्यामधे लोनावला ग्रामीण पोलिसांना यश आले आहे .अश्या प्रकारची माल पुरवठा करणारी मोठी साखळी असल्याची शक्यता लोनावला ग्रामिण चे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना व्यक्त केली. सदरची करवाई पूणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलिस अशिक्षक मितेश घट्टे लोनावला उपविभागाचे सहहयक पोलिस अधीक्षक आय पि एस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ,सहाय्यक पोलिस निरीक्षक देवीदास कारंडे ,सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज बनसोडे,गणेश होळकर,केतन तळपे,राहुल खैरे ,प्रशांत तूरे यांनी कारवाई केल्याचे लोनावला ग्रामीण चे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page