महिला मंडळ लोणावळा यांच्यावतीने भव्य भोंडला आणि रास गरबाचे आयोजन


मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, महिला मंडळ लोणावळा यांच्यावतीने भव्य भोंडला आणि रास गरबा चे आयोजन करण्यात आले, पारंपारिक गाणी गात गात लोणावळा परिसरातील असंख्य महिलांनी यामध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतला व नवरात्रीचा आनंद उपभोगला. महिला मंडळातर्फे दहा लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते तसेच नऊ उत्स्फूर्त बक्षीसे देण्यात आली आलेल्या सर्व महिलांना खिरापती मध्ये नाश्त्याचे आयोजन करण्यात आले , ज्येष्ठ भगिनी लहान मुलींनी फेर धरत गरब्याचा आनंद लुटला, अनुक्रमे सेजल खिल्लारे, वसुधा पाटील, कांता सातपुते, लक्ष्मी देशपांडे, सेजल कुटे, भाग्यश्री घोंगळे, शांता डिसले , रूपाली न्हालवे, शारदा भाकरे, कांचन सातपुते या महिलांना लकी ड्रॉ ची बक्षीस मिळाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला मंडळ अध्यक्ष सौ मनीषा बंबोरी व कार्यकारणी सदस्य उमा मेहता , मेधा वैद्य, प्रतिमा खळदकर, सुनिता रावण, मीनाक्षी गायकवाड, श्रुतिका राणे या सगळ्यांचे सहकार्य लाभले




