वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड सोमनाथ पवळे यांची बिनविरोध निवड




मावळ मराठा न्युज:- वडगाव मावळ, दिनांक २० जानेवारी, २०२४ वडगाव न्यायालयातील वकीलांसाठी काम करणारी एक नामांकित संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सन २०२४ -२५ साठीच्या अध्यक्षपदी जेष्ठ विधिज्ञ व समाजकार्याची विशेष आवड असलेले अॅड सोमनाथ सिताराम पवळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अॅड दीपकजी चौधरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आज अॅड पवळे यांचेकडे सोपवली. वडगाव न्यायालयाच्या वकील बार रूममध्ये असोसिएशनच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अॅड मोनाली कुलकर्णी (शेलार) व अॅड प्रिया पंडित तसेच सचिवपदी अॅड अक्षय रौंधळ व अॅड प्रणोती पिंगळे तर खजिनदारपदी अॅड मिनाक्षीताई ढोरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सर्व आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या बैठकीसाठी जेष्ठ विधिज्ञ अॅड एल.एम.कौशल सर, सल्लागार अॅड नामदेवराव दाभाडे, मार्गदर्शक अॅड रंजनाताई भोसले, अॅड एस एम मोरे, मा. अध्यक्ष धनंजय कोद्रे, मावळते अध्यक्ष अॅड दीपकजी चौधरी, सचिव अॅड राम शहाणे आदी मान्यवरांसह अनेक वकील बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व असोसिएशन करत असलेल्या सामाजिक कार्याचे सर्वांनीच कौतुक केले. सर्व मान्यवरांनी यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड सोमनाथ पवळे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले व सर्वांना सोबत घेवून काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी अॅड सुबोध कालेकर, अॅड करण लोंढे, अॅड रोहित कदम, अॅड स्नेहा परदेशी, अॅड सागर शेटे, अॅड प्रियांका शिंदे, अॅड अंकित आलम, अॅड हेमंत साबळे, अॅड युक्ता पवार यांची असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.




