स्मारकाचे सर्व अडथळे दूर करून काम सुरू झाले नाही तर १ जुलै पासून आमदार शेळके यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषणाचा वाघमारे यांचा इशारा

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,लोणावळा दिक्षाभूमी भिम तिर्थ येथिल भारत रत्नं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम मंजूर नकाशा प्रमाणे सुरू करणे बाबत पश्चिम महाराष्ट्र आरपीआय (आठवले)चे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यानी मावळचे आमदार सुनील शेळके यांना दिले आहे. लोणावळा शहरा मध्ये गेल्या तीस परतीस वर्षा पासुन अस्तित्वात असणाऱ्या भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम चालू आहे. लोणावळा नगर पालिकेच्या वतीने सर्व कायदेशिर बाबींचे पूर्तता करून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरु केलेले आहे. तत्पूर्वी या कामाचे भूमिपुजन सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व राजकिय पक्षांचे पदाधिकारी लोणावळा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. आपल्याला प्रोटोकॉल नुसार तालुक्याचे आमदार म्हणून तुम्हाला देखिल अमंत्रित केले होते असेही वाघमारे यांनी शेळके यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.वाघमारे यांनी पत्रात पुढे असेही म्हटले आहे कि दोन वर्ष पुतळ्याचे काम व्यवस्थित चालू होते कोणाची हि कोणतीच तक्रार नव्हती, अचानक पणे आपण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम थांबविण्याचे पत्र दिले आणि आपल्याच विभागाच्या वतीने चालू असलेले काम नगर पालिकेने थांबविले वास्तविकता शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लोणावळ्या सारख्या मध्यवर्ती शहरात होत आहे. याचा सर्वांनाच अभिमान आहे,परंतु दोन्ही कामे ७० टक्के पूर्णत्वास आल्या नंतर अग्नीशमन अँब्युलन्स या साठी ६ मीटर चा रस्ता आवश्यक आहे हे अधिकाऱ्याच्या लक्षात आले नाही का? यापूर्वी समस्त लोणावळाकरांची सहविचार सभा आयोजित केली असती तर आज जे प्रश्न निर्माण झालेत व शहरातील सामाजिक वातावरण दुषित झाले ते झाले नसते. पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी लागणारी तांत्रिक मंजूरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली आहे हे विशेष त्यांनी हा ६ मीटर चा मुद्दा त्यावेळी उपस्थित केला नाही तांत्रिक मंजूरी देतांना ६ मीटर अंतरांची अट टाकली असती तर कामाचे टेंडरच निघाले नसते आणि पुढचा अनर्थ टळला असता आणिउपजिल्हा रुग्णालयाला या साऱ्या अत्याधुनिक सुविधा आवश्यक होत्या तर सार्वजनिक बांधकाम विभागाने दवाखाण्याचे बांधकाम सुरू करतांना त्यांनी ६ मीटर चे अंतर सोडून बांधकाम करणे आवश्यक होते परंतु तसं काही घडलेले दिसत नाही आता ६ मीटर जागा आवश्यक आहे परंतु प्रत्यक्ष जागेवर काही ठिकाणी ५.८० मीटर आहे तर काही ठिकाणी ५.४० मीटर आहे म्हणजे फार मोठ्या जागेची आवश्यकता नाही.केवळ पॉईंट ४० मिटर जागा कमी पडत आहे त्यासाठी संपूर्ण भिंत पाडणे हे अन्याय कारक आहे. असेही वाघमारे यांनी पत्रात नमूद केले आहे. भारतरत्नं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण रखडलेले आहे उपजिल्हारुग्णालयाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाची ती नैतिक व कायदेशिर जबाबदारी होती ६ मीटर अंतर ठेवण्याची सदरची जागा खाजगी मालकाची असती तर त्यांची बिल्डींग पाडली असती का? म्हणून आपण हा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता मावळ तालुक्यात जातीय सलोखा आबाधित रहावा म्हणुन हा प्रश्न जास्त ताणून न धरता भारतरत्नं डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या स्मारकाचे काम त्वरित सुरु होईल असा विचार करावा आपल्या पत्राच्या आडून लोणावळा नगर पालिकेतील अधिकारी सर्व सामान्य नागरिक ठेकेदार यांस वेठीस धरत आहेत त्याचा परिणाम महायुती वर होत असून त्याचा फटका भविष्यात झाल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देखील वाघमारे यांनी दिला आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन एका आठवड्‌याच्या आत स्मारकाचे सर्व अडथळे दूर करून काम सुरू झाले नाही तर १ जुलै पासून आपल्या तळेगाव येथिल कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असाही इशारा सूर्यकांत वाघमारे यांनी शेळके यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page