शिवसेवा प्रतिष्ठानकडून प्राचीन भारत नकाशा लोणावळ्यातील शाळाना भेट


मावळ मराठा न्यूज,लोणावळा:-शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनंजय चंद्रात्रे यांच्या संकल्पनेतून व शिवसेवा चे कार्यकर्ते ऋषिकेश राऊत यांच्या अभ्यासातून तयार करण्यात आलेला प्राचीन भारताचा नकाशा आज लोणावळ्यातील आठ शाळांमध्ये भेट देण्यात आला.हा नकाशा तयार करून शाळांना पोहोचविण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, हजारो वर्षांपूर्वी आपल्या राष्ट्राचे वैभव किती होते व आपला देश कुठपर्यंत पसरला होता याची ओळख आपल्या सर्व पिढीला व्हावी व पुढील पिढ्यांपर्यंत संक्रमित व्हावी.या सर्व भागांना तसेच शहरांना काय नावे होती तसेच अनेक आक्रमणां नंतर आपण काय गमावले आहे हे कळल्याशिवाय आपल्याला काय टिकवायचं आहे हे कसे कळणार? म्हणून संस्थेने हा प्रयत्न करायचा ठरवला आणि शाळा शाळां मधुन हा नकाशा पोहचवण्याचे ठरवले. लोणावळ्यात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व मा. नगरसेवक दत्तात्रय येवले यांनी पुढाकार घेतला आगामी काळात लोणावळ्यातील सर्व शैक्षणिक संस्थांपर्यंत हा नकाशा पोहचवण्याचा संकल्पहि त्यांनी जाहिर केला. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी श्री. धनंजय चंद्रात्रे, श्री. दत्तात्रय येवले, श्री. जी.पी. यादव, श्री. प्रमोद देशपांडे. श्री. राजेश येवले, श्री. रितेश गुप्ता व श्री हिर्लेकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.




