१२ जानेवारीला लोणावळ्यात रेलरोको,लोकप्रतिनिधी हतबल,आता ही लढाई लोणावळा,खंडाळाच्या नागरिकांच्या अस्मितेची

मावळ मराठा न्यूज,लोणावळा :-लोणावळेकर जागरूक नागरीक यांच्या वतीने लोणावळा शहरातील शाळकरी मुले,कष्टकरी,चाकरमानी छोटे मोठे व्यवसायीक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व पक्षीय निवेदने,आंदोलने देऊनही ढिम्म रेल्वे प्रशासन कोणतीही दखल घेत नाही,नागरिकांनी आमदार,खासदार,मंत्री यांना निवेदन देऊन ही रेल्वे प्रशासन काहीच करत नसेल तर आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल असे लक्षात आल्यानंतर लोणावळाकर नागरिकांनी ही लढाई स्वतः लढण्याचे ठरविले आहे., यासंदर्भात सर्व शाळा मध्ये निवेदन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. कोरोना काळापूर्वी सुरु असलेल्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरु करून लोणावळा स्टेशनला थांबा द्यावा या मागणीसाठी १२ जानेवारीला मोठे रेलरोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात रिक्शा संघटना,टॅक्सी चालक, मालक संघटना या देखील यात सहभागी होणार आहेत. यावेळी रेल रोकोची पुढील दिशा ठरवण्यात आली. येथील”संचेती लॉन” येथे झालेल्याबैठकीत सर्व पक्षाचे अध्यक्ष,पदाधिकारी,रिक्षाचालक,टॅक्सी चालक मालक संघटना यांचे सोबतच जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते लोणावलेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणावळा शहरातील व ग्रामीण परीसरातील सर्व जागरूक नागरीकांनी १२ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संपूर्ण लोणावळा शहर संपूर्ण दिवस बंद ठेवून आंदोलन यशस्वी करण्याचे ठरले त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहावे व तसेच ईतर लोकांना देखील कळवावे असे आवाहन जागरूक नागरीक, लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांचे वतीने करण्यात आले. लोकप्रतिनिधीना फक्त नागरिकांची मते पाहिजेत त्यांना या महत्वाच्या आणि लोणावलेकरांच्या अस्मिते च्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.याकडे मात्र लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मावळ लोकसभेचे खासदार यांना पत्रकारांनी वारंवार लोकल,एक्सप्रेस आणि लोणावळा थांबा साठी वारंवार पाठपुरावा केला आहे.त्यांनी लोकसभेत प्रश्न मांडला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही असे दिसल्यावर लोणावळाकर नागरिकांनी आपली लढाई आपणच कोणत्याही पक्षाच्या बॅनर खाली न लढता लोणावळ्या चा नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकी कडे इन्फ्रास्टक्चर नावाखाली करोडो रुपये खर्च करणारे रेल्वे प्रशासन मात्र आहे त्या सेवा बंद करून नागरिकांच्या अडचणीत भर घालत आहे. त्यामुळे हतबल झालेले मावळ चे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळचे आमदार सुनिल शेळके माजी राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे हे सर्व लोकप्रतिनिधी लोकल फेरी पूर्ववत आणि एक्सप्रेस गाड्या थांबा लोणावळा येथे करण्यासाठी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ही लढाई आता लोणावलेकरांनीच हाती घेतली आहे त्याला नक्कीच यश येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page