लोणावळा महाविद्यालयाच्या वतीने देवले येथील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना राख्या,वृक्षरोपण आणि शालेय साहित्य वाटप




मावळ मराठा न्यूज़ लोणावळा, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व N.S.S. च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, अनाथ बालकांसाठी शैक्षणिक साहित्याची वाटप या माध्यमातून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्री विलास पाटील , कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. राहुल सलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनाथ आश्रमातील मुलांना राख्या बांधून शैक्षणिक साहित्याचे मुलांना वाटप करण्यात आले व त्या परिसरात वृक्षारोपण चा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे प्रमुख श्री सतीश मून यांनी स्वयंसेवकांना आपल्या मार्गदर्शनातून पाण्याचे महत्व सांगितले तसेच स्वयंसेवकांचे कौतुकही करण्यात आले. चौका- चौकात बसणारे व वेळ वाया घालवणारे युवक यांच्यापेक्षा पुढे भविष्यात तुमच्या हातून चांगले कार्य होईल अशी स्वयंसेवकांना प्रेरणा दिली .यावेळी तेथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .यावेळी शिक्षण ग्रामचे व्यवस्थापक माटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्ता माटे सर ,जाधव सर महाविद्यालयाच्या वतीने प्रा भूषण गोंणते ,प्रा. भावना रावळ, सोनाली यांनी विशेष परिश्रम घेतले .तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज पाटील सर समारोप प्रसंगी सर्वांचे आभार मानले .यावेळी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




