तळेगाव दाभाडे MIDCपोलीस स्टेशन हद्दीतील नवलाख उंब्रे येथील जाधव वाडी धरण येथे पूरजन्य परिस्थिती,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिक


मावळ मराठा न्यूज़:- वडगाव,(प्रतिनिधि ) सदर कॅम्पमध्ये वन्यजीवन रक्षक मावळ संस्था यांणी ॲम्बुलन्स ,बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा प्रत्यक्षिक घेण्यात आले. एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे प्रत्यक्षिक द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच नागरिकांना देखील सदरचे प्रत्यक्षिक दाखवण्यात आले .त्या प्रसंगी तळेगाव दाभाडे MIDCपोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासोबत व इतर पोलीस स्टाफ उपस्थित होता. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ ,भास्कर माळी,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, विनय सावंत,शुभम काकडे,सार्थक घुले,गणेश गायकवाड,अविनाश कार्ले,गणेश सोंडेकर,विकी दौंडकर,कुनाल दाभाडे ,श्रीयस भेगडे,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,गणेश ढोरे या डेमो कॅंप करण्याची तळेगाव दाभाडे MIDC पोलीस यांनी संस्थेला जी संधी दिले त्या बद्दल रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे आभार मानले



