ओवळे गावात भात लावणीच्या कामाला सुरूवात,पण भातशेती परवडेना झालीय

मावळ मराठा न्युज -शिवभक्त -अजित भाऊ शिंदे (शेतकरी-ओवळे )ओवळे-मावळ तालुक्यात पावसाने काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गाव व वाड्यापाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतमजुरांची उपलब्धता नसल्याने भाताची लागवड कशी करायची असा प्रश्‍न दरवर्षी नित्याचा झाला आहे.एकाच वेळी लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे बाहेर गावावरून मजूर आणावे लागत आहेत.मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. एका शेतमजुराला रोज ४०० ते ४५० रुपये आणि जेवणाचा खर्च द्यावा लागतो. यामुळे शेती जास्त कष्टाची आणि खर्चिक झाली आहे. त्यामुळे भातशेती करणे परवडत नाही. भाताचे भाव अनेक वर्षांपासून आहेत तेच आहेत.तसेच टॅक्ट्रर,खते यावर होणारा खर्च देखील जास्त आहे.त्यामुळे महागलेली भातशेती परवडत नाही.असे मनोगत अजित शिंदे यांनी व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page