शाळेच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या वेळेच्या अपव्यव, लोणावळा मनसेचा रेल्वेला थेट “रेल रोको”आंदोलनाचा इशारा

मावळ मराठा न्यूज़ :-लोणावळा ,अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी रेल्वेला निवेदन देऊन सुद्धा को रोना काळापासून बंद असलेल्या लोकल आणि बंद असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा लोणावळा स्टेशन वरील थांबा चालू करण्याबाबत अद्याप सुद्धा रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना तसेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु आता ह्या बाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन थेट रेल रोको आंदोलनाचा मनसेने इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात जर रेल्वे प्रशासनाने ह्या बाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही तर मनसे “रेल रोको”आंदोलन करणार असा इशारा आज लोणावळा शहर मनसेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे याप्रसंगी मनसे अध्यक्ष भारत रमेश चिकणे, अमित भोसले, उपाध्यक्ष सुनिल भोंडवे,मधुर पाटणकर, चिटणीस निखिल सोमण,संघटक श्री.अभिजित फाजगे,निलेश लांडगे, संदीप बोभाटे,सौ.दीपमाला ताई बोभाटे,कैवल्य जोशी, सुरेश राठोड,गणेश सोनाणी,रोकडे भाऊ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page