सत्यसाई कार्तिक यांची अवैद्य दारू वाहतूकीवर मोठी कारवाई,२,४६,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त


मावळ मराठा न्यूज़ :-लोनावला,लोणावला विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक आय पीएस सत्यसाई कार्तिक यानी आपटी गावात अवैध रित्या होणाऱ्या दारू वाहतूक वर कारवाई करुन पॅगो टेम्पोंसह एकूण २,४६ ,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .पुणे ते आपटी अशी दारू वाहतूकीचा परवाना नसताना टेम्पो मधून वाहतूक करीत आहे अशी गुप्त बातमिदारकडून महिति मिळाल्याने त्यांचे कडील व ग्रामीण पोलिस स्टेशन कडील अधिकारी आणि अमलदार यांचेसह आपटी रोडवर दबा धरुन बसून पॅगो कंपनीचा टेम्पो क्रमांक MH12TU1473 व त्यामधील ९६,६६० रुपयांची दारू असा एकूण २,४६,६६० रुपयांचा माल६ डिसेम्बर २०२३ रोजी पकडून त्यावरील चालकविरुद्ध ग्रामीण पोलिस स्टेशन ला महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे . यात पोलिस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे आणि आय पी एस सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन राउळ,भारत भोसले ,सीताराम बोकड़, किशोर पवार ,सुभाष शिंदे ,यांनी सदर कारवाई कली.




