वाय सी क्लासेस, लोणावळा यांच्या वतीने १० डिसेंबरला वार्षिक क्रीड़ा महोत्सवाचे आयोजन


मावळ मराठा न्यूज़:- लोणावळा,वाय सी क्लासेस, लोणावळा यांच्या वतीने १० डिसेंबरला वार्षिक क्रीड़ा महोत्सवाचे आयोजन येथील बोहरा मैदान ऑक्सीलियम शाळेसमोर लोणावला विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक आणि लोणावला नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे हस्ते सकाळी ८ वाजता झेंडा दाखवून क्रीड़ा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,कांग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस निखिल कवीश्वर ,माजी नगर सेवक दत्तात्रय येवले,एम् एन न्यूज़ चे मुख्य संपादक ॲड.संजय पाटील,भारतीय सैन्यदलात ३० वर्षे नौकरी केलेले सुभेदार कैलास येवले,शिवसेनचे सुभाष डेनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक क्रीड़ा महोत्स्वाचे उद्घाटन होणार आहे .वसंत कालेकर ,सहादु कालेकर ,सोमनाथ बोडके यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे. क्रिकेट ,कबड्डी ,खो खो , आट्यापाट्या ,लंगड़ी ,चेस ,१०० ,२०० मीटर धावने ,व्ह्यालिबॉल,डॉजबॉल ,तीन पायांची शर्यत आणि ४०० मीटर रिले अश्या स्पर्धांचा यात समावेश असणार आहे .मोबाइल चा अतीवापर चा जमान्यात मुलाना मातीशी पुन्हा जोडण्याचा ,क्रीड़ा क्षेत्राकडे करिअर ची संधी म्हणून पहावे यासाठी खाजगी क्लासेस चा हां उपक्रम म्हणजे नक्कीचा आदर्श म्हणावा लागेल .या कार्यक्रमाचे आयोजक क्लासचे संचालक निवृत्ति दुडे ,स्टाफ सुजाता मोहिते ,दीपेश गोनते ,जोगेश्वर खोब्रागडे मयूर कनगुटकर यांनी केले आहे तर तेजस भांगरे ,वरद घारे व क्लासचे माजी विद्यार्थी हे पंचम्हणून काम पाहणार आहेत .




