लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांची संयुक्त बैठक वडगांव येथे संपन्न

मावळ मराठा न्यूज़ वडगाव- ACB लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बैठक सोमवार दिनांक १३/१०/२०२५ रोजी वडगाव मावळ येथे ठीक अकरा वाजता पार पडली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निंबाळकर सर यांची वडगाव मावळ या ठिकाणी भेट घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कामकाज कशाप्रकारे चालते हे निंबाळकर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले .नागरिकांनी न घाबरता आपली तक्रार केली पाहिजे असे त्यांनी सांगितले तसेच तक्रारदारांचे नाव हे गोपनीय ठेवण्यात येते. शासकीय आणि निमशासकीय खात्यातील कोणतेही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करू शकतो. तसेच प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री नंबर ,ई-मेल आयडी, वेबसाईट यांची त्यांनी माहिती दिली.उपस्थित कार्यकर्तेअखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत महिला आयाम प्रमुख सौ नयना आभाळे, पुणे जिल्हा महिला आयाम प्रमुख कामिनी कडू, मावळ तालुका अध्यक्ष श्री सुभाष कडू ,उपाध्यक्ष श्री सचिन रगडे , श्री महेंद्र सुर्वे सह सचिव, सहकोषाध्यक्ष श्री राजेंद्र वझे, तळेगाव शहर प्रमुख श्री निरंजन जहागीरदार, प्रचार व प्रसिद्धी आयाम प्रमुख श्री दीपक साळवे, सदस्य श्याम लोखंडे तसेच श्री प्रदीप साठे ,श्री भारद्वाज ,सौ चेतना शहा, सौ शीतल वाघमारे ,येळे सर इत्यादी कार्यकर्ते आणि श्री निंबाळकर सर यांच्या समवेत भूमी अभिलेख कार्यालय, नागरी पुरवठा कार्यालय ,तहसील कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालय इत्यादी ठिकाणी जाऊन बॅनर चिटकवण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page