बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त लोणावळा शहर शिवसेना उबाठा च्या वतीने चित्रकला स्पर्धा

मावळ मराठा न्युज :- लोणावळा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहराच्या वतीने रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते‌ १.०० यावेळेत रायवुड उद्यान लोणावळा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाही चित्रकला स्पर्धेच आयोजन उपशहरप्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी जेडी, विभाग संघटक परेश बडेकर यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.चित्रकला स्पर्ध मधे लोणावळा शहर व परिसरातील ७०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.गेल्यावर्षी संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार मा श्री सचिनभाऊ आहिर, शिवसेना मावळ लोकसभा संघटक, मा. महापौर श्री संजोगभाऊ वाघिरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमास शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख, सरचिटणीस शिव वाहतूक सेना महेश केदारी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मावळ तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, सल्लागार मारूती खोले, नगरसेवक शिवदास पिल्लै, नगरसेवक माणिक मराठे,शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले,उपशहरप्रमुख प्रकाश पाठारे, उपशहरप्रमुख मनेष पवार, महिला आघाडी उपशहर संघटीका श्रीमती प्रभाताई आकोलकर, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, प्रसिद्धीप्रमुख विजय आखाडे, ग्राहक संरक्षण कक्ष शहर संघटक अशोक बोंद्रे, शिव वाहतुक सेना शहर अध्यक्ष गणेश कडु, विभाग प्रमुख कमर अन्सारी, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, विभाग प्रमुख संजय शिंदे, विभाग प्रमुख रतन मराठे, उपविभाग प्रमुख नागेश दाभाडे, विभाग प्रमुख बाळासाहेब मोहोळ, उपशहर अधिकारी धीरज मोहोळ, उपविभाग प्रमुख दिलीप गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक श्रीकांत कंधारे, उपविभाग प्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख अमोल शिंदे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे , कुणाल सपकाळ, शाखाप्रमुख प्रवीण कदम, शाखाप्रमुख उमेश कालेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कलाशिक्षक श्री दत्तात्रय थोरात, श्री चंद्रकांत जोशी, श्री रमेश बोंद्रे, श्री शिरीष बडेकर, श्री महेश येवले यांनी काम पाहिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page