१९ ते २५ जानेवारी २०२४ डोने येथे ए एस एम पिंपरी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न




मावळ मराठा न्युज:-मावळ, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ या काळात डोने येथे ए एस एम पिंपरी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ ला सदस्यआदर्श शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार काळोखे यांच्या शुभहस्ते आणि डीडी बाळसराफ यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरास ला. अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे आणि सरपंच व आदी मान्यवरांचा उपस्थितीत नेत्र शिबिराचा समारोप करण्यातआला.सुरुवातीलाच अध्यक्ष डॉ अनिकेत काळोखे यांनी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या सर्व उपक्रमाची व्याप्ती आणि कार्यपद्धती ही विद्यार्थ्यांपुढे मांडली.ज्येष्ठ ला.नंदकुमार काळोखे यांनी लायन्स क्लबचा डोणेगाव दत्तक घेण्यामागील क्लबचा उद्देश आणि गावची आतापर्यंत झालेली प्रगती याचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते ला. डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी विद्यार्थ्यांना आपला शारीरिक, मानसिक,अध्यात्मिक विकास कसा करता येईल?याची गुरुकिल्ली सांगितली. श्रीमान डीडी बाळसराफ सौ प्रियंका काळोखे, लक्ष्मी मॅडम त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग आणि शिबिरारर्थी विद्यार्थी यांचे विशेष योगदान असल्याने ए एस एम कॉलेजचा हा एन एस एस कॅम्प यशस्वी झाला. जवळजवळ एक आठवडाभर या शिबिरार्थी विद्यार्थ्यांची भोजनाची राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था गावकरी आणि ए एस एम महाविद्यालयाने डोणे गावातील विद्यार्थ्यांच्या वास्तव्यात ठेवल्याने-l निरोप घेताना सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते.




