लोणावळा महाविद्यालयात मावळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संधी








मावळ मराठा न्युज – लोणावळा,पुणे जिल्हा परिषद,पुणे, शिक्षण विभाग, मावळ पंचायत समिती, मावळ तालुका मुख्याध्यापक व विज्ञान अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट च्या डॉ. बी एन पुरंदरे कला, श्रीमती एस जी गुप्ता वाणीज्य व श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, वलवन, लोणावळा येथे आयोजीत करण्यात आले.या वेळी विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचीव नंदकुमार सागर यांचे मार्गदर्शन लाभले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक नगरकर यांनी बोलताना विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे ही काळाची गरज असून, विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन वृत्तीला चालना मिळते, असे प्रतिपादन केले. “आजचे विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ असून त्यांनी प्रश्न विचारण्याची सवय आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती जोपासली पाहिजे,” तसेच पटेटं प्राप्त करण्यासंदर्भात माहीती देऊन सहकार्याची भावना व्यक्त केली.या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य व सामाजिक उपयुक्तता या विषयांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. पाणी संवर्धन, नवीकरणीय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट तंत्रज्ञान आदी विषयांवरील प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमास ट्रस्ट चे विश्वस्त श्री. विशाल पाडाळे, श्री सुरेश ठोंबरे, मा. नंदकुमार सागर, कुंडलीक मेमाने, विस्तार अधीकारी सुदाम वाळुंज,विठ्ठल माळशीकारे,विकास तारे,सुरेश सुतार,अनेक मुख्याध्यापक, विज्ञानाचे मार्गदर्शकशिक्षक,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून करण्यात येणार असून उत्कृष्ट प्रकल्पांची जिल्हा स्तरासाठी निवड केली जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती लावरे आणि संजय साळुंके यांनी केले तर आभार डाॅ.आमर काटकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन विलास पाटील,ॲनी वर्गीस,डाॅ.अमर काटकर,डाॅ.संदीप सोनटक्के, चंद्रकांत मुरूमकर,डाॅ.नितीन बोडके आणि विज्ञान अध्यापक संघाचे पदाधीकारी यांनी केले. हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करणारे ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



