छत्रपती संभाजीनगर येथे पिंपरी-चिंचवड शहराचे पैलवान काळुराम लांडगे यांना महाराष्ट्र लोकन्यूज कडून”महाराष्ट्र भुषण”पुरस्कार








मावळ मराठा नेटवर्क -महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे डॉ. जीवन राजपुत साहेब यांचे कार्यालय मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राधान्य करण्यात आले आहे तसेच पत्रकारितून चॅनलच्या सर्व प्रतिनिधींना पुरस्कार देण्यात आलेले आहे सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक ,कला,क्रिडा,पत्रकारिता, शैक्षणिक,आरोग्यविषयक, पर्यावरण, राजकिय,सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय सामाजिक कार्य असल्यामुळे कासारवाडीचे पैलवान काळुराम लांडगे यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे प्लस हॉस्पिटलचे संचालक श्री. जीवन राजपूत ,सेवानिवृत्त पीएसआय श्री. आप्पासाहेब काळे पाटील ,अविष्कार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील वरकड,युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अन्सार शेख साहेब , जाफराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.गोविंदराव पाटील पंडित ,माजी पंचायत समिती सदस्य श्री.मधुकर पाटील गाढे ,जालन्याचे जि.प. सदस्य व भाजपा नेते श्री.दत्तात्रय पाटील पंडीत यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , मानपत्र व शाल,श्रीफळ ,देऊन ” महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२६ “हा पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी श्री अशोक पाटील बनकर जालना जिल्हा भाजपा उपाध्यक्ष,मराठवाडा सल्लागार अरुणराव देऊळगावकर , संस्थापक अध्यक्ष मा. परशुराम मुळे,कार्यकारी संपादक बी. डी. सवडे,कार्यकारी सहसंपादक श्री.खेमराज शरणागत, मुख्य कार्यकारी उपसंपादक श्री.अभिजीत चव्हाण हे उपस्थित होते. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र उद्योग क्षेत्र व राजकीय क्षेत्र व राज्य क्षेत्र सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजीक कार्य केल्या बद्दल केल्याबद्दल एकुण २५ जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.यावेळी पुरस्कार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी खुप गर्दी केली होतीसंपुर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्य संपादक श्री.गजानन देठे पाटील,उपसंपादक श्री.योगेश पाटील निकम व त्यांच्या टीमने भरपुर प्रयत्न केले.



