छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न,आरपीआय सोडून सर्व पक्ष एकाच व्यासपीठावर

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,बहुचर्चित विषय जो गेल्या ५ वर्षांपासून लोणावळा शहरातील विकासाच्या कामात सर्वाधिक अग्रस्थानी होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचा प्रश्न अखेर आज शिवजयंतीच्या दिवशी मार्गी लागला आहे. या शिवजयंतीला या पुतळा सुशोभीकरण कामाच्या मागणीसाठी शहरात अनेक राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून उपोषण, मोर्चा, आंदोलन करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, अमित गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजू बच्चे, सुधीर शिर्के, आरोही तळेगावकर, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, दत्तात्रय येवले, मंदा सोनवणे, बिंद्रा गणात्रा, शादान चौधरी, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, भाजप शहराध्यक्ष अरुण लाड, काँग्रेस शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष विलास बडेकर, मनसे शहराध्यक्ष भारत चिकणे, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी प्रदेश महिला उपाध्यक्ष मंजुश्री वाघ, लोणावळेकर जागरूक नागरिक मंचचे किरण गायकवाड, यशवंत पायगुडे, नासिर भाई शेख यांच्या शहरातील सर्वपक्षीय आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

पुतळे उभे करून नागरिकांच्या सुविधा आडवा बाबासाहेबांची शिकवण नाही – सुनील शेळके

आरपी आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांचे नाव न घेता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वरील वक्तव्य केले. लोणावळा शहरातील उपजिल्हा रुग्णालय उभारत असताना यासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या मंजुऱ्या मिळवण्या मध्ये खूप वेळ गेला, आणि अजूनही जात आहे. असे असले तरीही सर्व मंजुऱ्या आणून येत्या ६ महिन्याच्या आत हॉस्पिटल गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगत असताना एक खंत मात्र आमदार शेळके यानी व्यक्त केली. या रुग्णालयात जाण्यासाठी पर्याप्त असा रस्ता जोवर रुग्णवाहीका जाण्यायोग्य रस्ता मिळणार नाही तोवर मी हे हॉस्पिटल सुरू करणार नाही असे आमदार सुनील शेळके यांनी जाहीरपणे या कार्यक्रमात सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी शिकवण दिली, माझे पुतळे उभे करून नागरिकांच्या सुविधा आडवा असे सांगितले नाही.

अठरा पगड जाती,बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन जाण्याचा आदर्श सांगितला गेला पण आम्हाला दूर ठेवले ही महाराजांची शिकवण नाही-सूर्यकांत वाघमारे

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनाचे स्वागत आहे. आरपीआयच्या वतीनं देखील या कामाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे या कामाचे भूमिपूजन होत असताना आरपीआयचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात सहभागी व्हायला आम्हाला निश्चितच आवडले असते. पण कदाचित जाणीवपूर्वक या कार्यक्रमापासून आम्हाला दूर ठेवले गेले. हा शिवरायांचा विचार निश्चितच नाही. सर्वांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते. पण याठिकाणी एकीकडे अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन पुढं जाण्याचा छत्रपतींचा आदर्श सांगितला गेला आणि दुसरीकडे मात्र आम्हाला कार्यक्रमापासून दूर ठेऊन हा विचार पायदळी तुडवला गेला अशी प्रतिक्रिया आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page