लोणावळा शहर भाज प च्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा वाढ दिवस बालग्रामच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवून साजरा

मावळ मराठा न्यूज़ ,लोणावला,महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स बाजी व ईतर अनावश्यक खर्च न करता लोणावळा शहर भाजपाच्या वतीने आपण या समाजाचे काही देणे लागतो या भावनेने आंतरभारती बालग्राम भुशी लोणावळा येथील मुलांना शालेय उपयोगी बॅग ,कंपास पेटी साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा युवा मोर्चा मावळ तालुक्याचे मा.कार्याध्यक्ष अरुण लाड यांनी केले तर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी ,लोणावळा भाजपचे अध्यक्ष रामविलासजी खंडेलवाल यांनी केले. यावेळी मा. नगरसेवक ललीतजी सिसोदिया, भाजयुमो तालुका कार्याध्यक्ष अर्जुनभाऊ पाठारे, भाजयुमो शहराध्यक्ष शुभम मानकामे, श्री भरतजी कोकरे, हर्षलजी होगले , महिला आघाडी अध्यक्षा योगिताताई कोकरे, शहर सरचिटणीस अमितभाऊ गंन्धे, युवानेते आयुष कांक्रिया, महिला वर्ग, तसेच बालग्राम संस्थेच्या वतीने आंतर भारती बालग्रामचे प्रिन्सिपल श्री सुधाकर हेंद्रे आंतर भारती बालग्राम स्कूल चे डॉ. संदेश कदम व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यां वर्ग उपस्थित होते .आभार प्रदर्शन आंतर भारती बालग्रामच्या प्रकल्प प्रमुख डॉ. शुभांगी भोर यांनी केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page