मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे – डॉ. चंद्रशेखर भगत


मावळ मराठा न्यूज :-लोणावळा : प्रत्येकाने आपल्या घरात मराठी बोलली पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिचा जागर करणे आपल्या प्रत्येकाचे काम आहे. आपल्या मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास जाणून घेतल्यानंतर मराठीची महती आपल्याला कळते. यामुळे आपण सर्व ठिकाणी तिचा वापर करून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. असे मत व्ही. पी. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत यांनी व्यक्त केले. निमित होते लोणावळा एजुकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या गौरव दिनानिमित्ते ग्रंथदिंडी व भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख म्हणाले, ‘कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले आहे. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांनी मराठी जणांना प्रेरणा दिली आहे. त्यांनी कविता, नाटक आणि इतर साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा केली आहे. या योगदानामुळे त्यांना मराठीतला सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. विशाल पाडळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व विद्यर्थ्याना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी मराठीचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहनही त्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, प्रा. संदीप खाडे, प्रा. संतोष शिंदे, डॉ. पवन शिंगारे, प्रा. संदीप लबडे, प्रा. दीपक तारे, प्रा. धनराज पाटील, प्रा. भक्ती अहिर, प्रा. संजय साळुंखे यांचे योगदान मोलाचे होते. तसेच या कार्यक्रमाला सहकारी प्राध्यापक, प्रध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी प्रफुल्ल पाळेकर, अजय ढम तसेच लोणावळा शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडीसमारोपाप्रसंगी डॉ. विलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पवन शिंगारे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र देवरे यांनी केले. तसेच आभार प्रा. दीपक तारे व प्रा. धनराज पाटील यांनी मानले.




