आंबेडकरवादी महिला आघाड़ीचा दणका,आमदार सुनील शेळकेनी पालिकेला पत्र देऊन थांबवलेले काम होणार सुरु



मावळ मराठा न्युज:- छत्रपती शिवाजी महाराज भूमिपूजन सोहळ्यात सूर्यकांत वाघमारे यांचे नाव न घेता आमदार सुनील शेळके रुग्णवहीका आणि पार्किंग साठी जागा दिल्याशिवाय हॉस्पिटल सुरु होणार नाही अशी आड मुठी भूमिका घेतल्यापासून लोणावळ्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते. लोणावळा उपजिल्हा हॉस्पिटल कामाचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण कामाचा काहीच संबंध नसताना सदर काम का बंद केले तसेच हा लोणावळा नगरपरिषद ने ठराव मांडून काम सुरु केले आहे तर आमदार सुनील शेळके यांच्या सांगण्यावरून तुम्ही काम का थांबविले असा जाब आंदोलनाचे नेतृत्व करणारे सूर्यकांत वाघमारे यांनी मुख्याधिकारी साबळे यांना विचारला.भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्यासाठी सर्व प्रकारच्या एन ओसी असताना अधिकृत रीत्या गेली दिड वर्ष काम चालू होते. बाबासाहेब डहाणूकर हॉस्पीटल बांधताना त्याची एकूण खाटांची संख्या, रहीवासी डॉक्टर्स,नर्सेस,स्टाप,यांची संख्या तसेच त्यांच्या व पेशंटला भेटण्यास येणा-या लोकांच्या गाडी पार्कींगची व्यवस्था तसेच अँबूलेंन्स पार्कींग कुठे व कशी असावी? हे हॉस्पीटलचा प्लान बनविताना लोनावळा नगरपालीकाने व आर्किटेक्टने विचारात का घेतल नाही? या वर नक्कीच प्रश्न निर्माण होतो. पार्कींगचा प्रश्न गेली दिड वर्ष पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम चालू आहे तेंव्हा कुठलीच समस्या निर्माण झाली नाही आणि काम चालू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या ह्या सुद्धा मिळालेल्या आहेत. अचानक काहीतरी कारण सांगून काम का बंद केले ? याचा जाब विचारण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेत मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या दालनात आंबेडकरवादी महिला आघाड़ी यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत काम सुरु करणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहील असे सांगितल्याने ४ तासानंतर मुख्याधिकारी साबळे यांनी लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. आज रोजी समस्थ आंबेडकरवादी महिला आघाड़ी यांचे लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सदर शिष्ट मंडळाने निवेदन देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण चे बंद पडलेले काम तातडीने सुरु करण्यात यावे याबाबत मागणी केली त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. राठोड, मुख्याधिकारी साबळे सह नगरचनाकार आणि आंबेडकरवादी महिला आघाडी यांचे समवेत हॉस्पीटल करिता आवश्यक असणा-या पार्किंगच्या जागेची पहाणी करण्यात आली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. राठोड यांनी सदर हॉस्पीटलला पुरेशी पार्किंग व्यवस्था धरण्यात आलेली आहे. तथापि व्हीजीटरसाठी पार्कीग व्यवस्था अपूरी पडल्यास नगरपरिषदेकडे लेखी स्वरुपात मागणी करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या दबावाखाली यापूर्वी कार्यादेश देण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ववत सुरु करावे असं पत्र मुख्याधिकारी यांनी आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनकर्ते यांना दिले. त्यामुळे सूर्यकांत वाघमारे यांनी म्हटल्याप्रमाणे लोणावळ्यातील आरोग्यचे स्वास्थ्यपेक्षा सामाजिक स्वास्थ्य महत्वाचे आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले.




