महाशिवरात्रीला महादेवाच्या नागाचे घरीच दर्शन, वन्यजीव रक्षक

मावळ संस्थेच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळलामावळ मराठा न्युज :-तळेगाव,आज महाशिवरात्र सगळीकडे शंकराच्या पिंडीवर बेलपुष्प वाहून प्रार्थना करण्यासाठीचा दिवस परंतु महादेवाचे गळ्यात असणारा नाग मात्र आज एका घरामध्ये पहाटेच्या वेळी अवतरला व घरात राहणारे कुटुंब यांची मात्र घबराट झाली असा जणू प्रकार आज शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी पहाटे साधारण पावणे चार च्या सुमारास J/२, प्रतिक नगर, तळेगाव स्टेशन येथील तळमजला येथे राहणारे रहिवासी कविराज पाटोळे (निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांच्या घरात घडला.साधारण साडे चार पाच वाजण्याच्या सुमारास नागाच्या फुसकराच्या आवाजाने जाग आल्यामुळे घरातील व्यक्तींना नाग हा समोरील टेबल वरती फणा काढून बसल्याचे दिसून आले. घरातील व्यक्तींनी नागाची माहिती शेजारी राहणारे आवाज न्यूज चे पत्रकार राजेश बारणे यांना दिली पहाटेच्या सुमारास घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी सर्पमित्र भास्कर माळी यांना फोन केल्यावर अगदी दहाच मिनिटात ते दाखल झाले व सुरक्षित रित्या नागाला रेस्क्यू केले.सुरुवातीला भास्कर माळी यांचा फोन लागत नसल्यामुळे निलेश गराडे यांच्याशी संपर्क केला असता ते येण्यासाठी निघाले होते मात्र दरम्यानच्या काळात भास्कर माळी यांच्याशी संपर्क झाला आणि विना विलंब येऊन त्यांनी नागाला रेस्क्यू केले.सदैव वन्यजीव आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले वन्यजीव रक्षक मावळ संस्था संस्थापक निलेश गराडे आणि सभासद भास्कर माळी मामा यांचे घरातील सर्व उपस्थित नागरिकांनी मनापासून आभार मानले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page