तळेगाव ते ओवळे मुक्कामी एस.टी बस सुरू करावी तळेगाव आगार व्यवस्थापक यांना अजितभाऊ शिंदेचे लेखी निवेदन



मावळ मराठा न्युज :-ओवळे,गेली अनेक वर्षापासुन तळेगाव ते ओवळे ही मुक्कामी एस.टी सुरू होती. परंतु कोरोना लाॅकडाऊनच्या काळात एस.टी चा प्रवास बंद करण्यातआला होता. ही एस.टी त्याकाळात बंद करण्यात आली.परंतु कोरोनानंतर तळेगाव ते ओवळे एस.टी च्या वेळापत्रकात बदल झाला.ओवळेला येणारी तळेगाव ते ओवळे ही मुक्कामी एस.टी बंद झाली.त्यामुळे ओवळे येथुन तळेगाव येथे येणार्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना वेळेवर तळेगाव येथे शाळेमध्ये,कामावर पोहोचण्यास एस.टी.उपलब्ध होत नसल्याने उशिर होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहे.म्हणुन ओवळे गावातील अनेक विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी हा प्रश्न ओवळे गावातील सामाजजिक कार्यकर्ते-शिवभक्त-अजित भाऊ शिंदे यांच्याकडे मांडला असता, शिंदे यांनी तळेगाव एस.टी आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधुन चर्चा केली.व ओवळे ते तळेगाव मुक्कामी एस.टी सुरू करावी ह्यासाठी निवेदन दिले.व तळेगाव आगार व्यवस्थापकीय अधिकारी – श्री.प्रमोद गायतोंडे यांनी ह्या विषयावर योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.




