मळवली ते कामशेत दरम्यान अनोळखी वृद्धाचा मालगाडीचे धडकेने मृत्यू,पोलिसांचे संपर्काचे आवाहन


मावळ मराठा न्यूज,लोणावळा ,दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याचा सुमारास मळवली ते कामशेत दरम्यान एक अनोळखी इसंम वय अंदाजे ७५ वर्षे हा धावती मालगाडी एम एस टी बी सी सी एच ची धडक बसून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापती मुळे मृत्यू पावला आहे.अंगाने सडपातळ उंची ५ फूट, रंगाने निमगोरा चेहरा, उभट दात,वरचे दोन शाबूत,सरळ नाक पांढरी दाढी,अर्धवट टक्कल असे त्याचे साधारण वर्णन आहे, मयताच्या अंगात नेव्ही ब्लू रंगाचा हाफ स्वेटर पांढरा रंगाचा फुल शर्ट काळया रंगांची नाईट पॅन्ट आणि चॉकलेटी रंगांची अंडर वेअर परिधान केली आहे तरी वरील वर्णन असलेल्या इसम चे कोणी नातेवाईक, मित्र,शेजारी वारस यांना ओळख पटल्यास त्यांनी लोणावळा रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जीआरपी पोलीस एस ई सावंत यांनी आवाहन केले आहे.




