रुचिका क्लब मुबंई व संपर्क संस्था यांच्या वतीने १९ आणि २० जानेवारी ला मोफत आरोग्य शिबीर

मावळ मराठा न्यूज :- १९ व २० जानेवारी रोजी संपर्क मळवली भाजे येथे होणार रुचिका क्लब मुबंई व संपर्क संस्था आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.मळवली,संपर्क संस्थेच्या मलवली भाजे येथील दवाखान्यात रुचिका क्लब मुंबई व संपर्क संस्था आयोजित मोफत डोळ्यांची तपासणी,मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप मोफत औषधे तसेच कान, नाक, घसा तपासणी तसेच स्त्री रोग तपासणी करण्यात येणार आहे व आवश्यकता नुसार रुग्णांना मोफत औषधे दिली जाणार आहेत.एच व्ही देसाई रुग्णालयाचे तज्ञ् डॉक्टर डोळ्यांची तपासणी करणार आहेत तर तज्ञ् डॉक्टर गिरी सुरज बालाजी हे कान नाक घसा याची तपासणी करणार आहेत तसेच स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर अश्विनी पवार या महिला रुग्णाची तपासणी करणार आहेयावेळी दूरवरून येणाऱ्या रुग्णासाठी रुचिका क्लब यांनी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे”संपर्क दवाखान्यात आम्ही रुग्णासाठी सुसज्ज व्यवस्था केली असून दवाखान्यात आसपासच्या ग्रामस्थांसाठी दातांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, बाल रोग तज्ञ्, स्त्री रोग तज्ञ् व प्राथमिक आरोग्य तपासणी सुविधा कार्यरत असल्याचे संपर्क चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी नमूद केले ” संपर्क मलवली भाजे केंद्रात दोन दिवस होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन रुचिका क्लब मुंबई चे सदस्य व अमिकुमार बॅनर्जी तसेच कार्ला मलवली व भाजे येथील मान्यवराच्या हस्ते 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे शिबीर यशस्वी करण्याकरिता संपर्क संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग व सहकारी परिश्रम घेत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page