सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे? न्यायाधीशच फरार,लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं,सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई

मावळ मराठा न्युज नेटवर्क -सातारा,फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी न्यायाधीश आणि त्यांचे एजंट यांचेकडून पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. तेही असे भ्रष्ट्राचाराने बरबटत असेल तर लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्याविरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते.सुप्रीमकोर्टाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गेल्याच महिन्यात रिटायर्ड झाले अपात्र आमदार विषयी निकाल मात्र तसाच प्रलंबीत राहिला.निवडणुका देखील झाल्यात.आता निकाल जरी आला तरी त्याचा काही उपयोग नाही. यात तर चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात नाही तर देशात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर,गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं मोठा तडा गेला आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले, त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तीघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे, पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर घटनेत जिल्हा सत्र न्यायाधीश हे आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने त्याना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी लागते ती प्रक्रिया सुरु असल्याने न्यायाधीश महोदय फरार झाले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page