आय पी एस सत्यसाई कार्तिक पुन्हा अँक्शन मोडमध्येकुरवंडे गावातील खाजगी बंगल्यावरील नंगा नाच करणाऱ्या ४ बार बालांसह ६ जणांना घेतले ताब्यात

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा, लोणावळा विभागाचे डी वाय एस पी आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी पदभार स्वीकारल्यापासून आपल्या काही महिन्यांचा कार्यकाळात सर्व सामान्य माणसांचा विश्वास आणि बेकायदा धंदे करणारे यांच्यावर आपला दबदबा निर्माण केला आहे. आल्या आल्या कार्तिक यांनी आपला मोबाईल नंबर सर्व सामान्य नागरिक यांचा साठी अश्या बेकायदा,अवैध धंद्यांबद्दल कुणाला काही माहिती मिळाल्यास स्वतः माझ्याशी थेट संपर्क करावा असे पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले होते.त्याचाच परिणाम म्हणून गुप्त बातमीदार यांचेकडून अनेक माहिती मिळत असतात आणि त्याच्या आधारे त्यांच्या सतत कारवाया चालू असतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी दिनांक एक एप्रिल ला गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीनुसार कुरवांडे गावातील शर्मा विला चा प्रांगणात बरेच जण सार्वजनिक शांतता भंग होईल अश्या पद्धतीने जोरजोरात साउंड सिस्टम लावून अश्लील हाव भाव करत बार बाला यांना नाचायला लावत असल्याची माहिती मिळाल्यावर आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी आपल्या हाताखालील कर्मचारी यांना सोबत घेवून त्या ठिकाणी छापा टाकला असता,त्याठिकाणी सदर अश्या प्रकारचा अश्लील हाव भाव करणाऱ्या व सार्वजनिक शांतता भंग करताना आढळून आले त्यांना पोलीस यांच्या मदतीने नामे शिवाजी रामचंद्र भोसले,धनाजी अर्जुन जगताप,अभिजित मच्चींद्र सोनलकर,संतोष नामदेव शिंदे,प्रवीण चंद्रमोहन पैलवान,फिरोज जहांगीर तांबोळी,सर्व राहणार सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्याचे आहेत. यांचेसोबतच नाचणाऱ्या ४ बारबाला महिला यांचे विरोधात लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला गुन्हा क्रमांक ८३/२०२३ दाखल करण्यात आला असून त्यांचेवर भारतीय दंड विधान कलम २९४,१८८ आणि ३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ एन १३१ अंवन्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तसेच सदर गुन्हा करण्यास सहाय्य करणाऱ्या बंगला भाड्याने घेवून चालवणारे लक्ष्मण दाभाडे राहणार लोणावळा, बंगला केअर टेकर कैलास पवार राहणार खंडाळा,गुरू पाटील राहणार तुंगरली,लोणावळा यांनाही आरोपी करण्यात आले आहे.सदर ची कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभागाचे आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी पथकातील अंकुश नायगुडे, अंकुश पवार,सुभाष शिंदे, जयराज पाटणकर, मनोज मोरे यांच्या मदतीने केली पुढील तपास पोलीस हवालदार जयराज पाटणकर करीत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page