कै. डॉ. शं. वा. परांजपे यांच्या १०० व्या जन्म दिनानिमित्त मानवंदना ; कै.अण्णांच्या स्मृतींना उजाळा

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रात, कलापिनीचे संस्थापक कै. डॉ. शं. वा. परांजपे उर्फ अण्णा यांच्या १०० व्या जन्म दिनानिमित्त मानवंदना दिली. कलापिनीतील नाट्य प्रशिक्षण शिबिरात कै.अण्णांच्या स्मृतींना उजाळा दिला. डॉ. अनंत परांजपे यांनी या नाट्यवेड्या माणसाचा जीवन प्रवास कथन केला. गो. नी. दांडेकर यांनी कै.अण्णांवर लिहीलेल्या १९७७ सालच्या स्मरणिकेतील लेखाचे अनघा बुरसे यांनी वाचन केले. अंजली क-हाडकर व अवनी परांजपे यांनी गीत गायन करुन आदरांजली वाहिली.. अंजू ताईंनी अण्णांनी काम केलेल्या नाटकांचे जुने फोटो सर्वांना दाखवून त्या आठवणी जागवल्या. या जन्म शताब्दी वर्षात अनेक नाट्य विषयक कार्यक्रम सादर केले जातील असे सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले. हीच खरी कै.अण्णांना आदरांजली ठरली. प्रार्थना व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page