लोणावळा महाविद्यालयात “कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित औषध संशोधन” विषयावर सहा दिवसीय ई-एफडीपी कार्यशाळा संपन्न






मावळ मराठा न्युज -लोणावळा, १८ जुलै २०२५: लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट्चे, डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती. एस. जी. गुप्ता कॉमर्स, आणि श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयांमधील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आणि वे रिसर्च सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम औषध संशोधनः औषध शोध ते क्लिनिकल चाचण्या (AIEPR-२०२५ )” या विषयावर आधारित ६ दिवसीय राज्यस्स्रावरील ऑनलाईन फॅकल्ट्री डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (ई-एफडीपी) दिनांक १२ जुलै ते १७ जुलै २०२५ दरम्मान यशस्वीरित्या पार पडला.या कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे AI या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग औषध संशोधनात कसा करता येतो, याची शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना सखोल माहिती देणे हा होता. दररोज सायंकाळी ७:३० वाजता ऑनलाईन सत्रांद्वारे विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन कृत्रिम बुद्धिमत्ता पीएच.डी. अभ्यासक रोहित काळे (USA), प्रा. प्राजक्ता पुजारी आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रास्ताविकात डॉ. देशमुख यांनी सांगितले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता ही औषध संशोधनात क्रांतिकारी बदल घडवणारी संकल्पना आहे. औषधांच्या शोध, विकास आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये AI चा उपयोग संशोधन प्रक्रियेला अधिक वेगवान व अचूक बनवतो.ई-एफडीपीच्या विविध सत्रांमध्ये औषधनिर्मित उद्योग, संशोधन संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी AI वर आधारित विविध सॉफ्टवेअर टूल्स आणि प्रात्यक्षिक यांचा परिचय करून दिला. पीएच.डी. अभ्यासक रोहित काळे (USA) यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर AI चा औषध क्षेत्रातील वापर यावर अमेरिकेतून सखोल मार्गदर्शन केले. डॉ. मल्हारी नागटिळक यांनी प्रथिने-औषध परस्परक्रिया अभ्यासात AI चा उपयोग,तसेच आण्विक डॉकिंग आणि प्रथिने-औषध बंधन सॉफ्टवेअर बाबत सविस्तर विवेचन केले.या राज्यस्तरावरील कार्यशाळेत राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील शैक्षणिक, औषधनिर्मित कंपन्यांतील वैज्ञानिक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देण्झात आले.कार्यक्रमाचे समन्ध्रयक डॉ. मल्हारी नागटिळक (लोणावळा महाविद्यालय) होते. प्रा.एस. एन.लबडे,डॉ.एस.जी. सोनटक्के(रसायनशास्त्र विभाग प्रमुख) आणि प्रा. तृप्ती वायदंडे (संस्थापक,वे रिसर्च सोल्युशन्स)यांनी संयोजन समिती सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख यांनी संपूर्ण टीमचे कौतुक करत, “अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम भविष्यात वारंवार आयोजित व्हावेत” अशी अपेक्षा व्यक्त केली.या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रमेशचंद्र नम्र, उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पाळेकर, सचिव ऍड. नीलिमा खिरे, खजिनदार श्री दत्तात्रय येवले व ट्रस्ट्चे सर्व पदाधिकारी यांनी रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




