डॉ बी एन पुरंदरे शाळेला रोटरी क्लब यांच्या वतीने स्पोर्ट्स किट्सचे वाटप



मावळ मराठा न्युज,लोणावळा :-डॉ बी एन पुरंदरे शाळेला रोटरी क्लब लोणावळा व रोटरी क्लब ऑफ निगडी,रोट्रॅक्ट क्लब ऑफ डी वाय.पाटील कॉलेज यांचे तर्फे स्पोर्ट्स किट्स भेट देण्यात आले.यावेळी रोटरीयनचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते. रोटरी क्लब ऑफ लोणावळा नेहमीच सामाजिक प्रकल्प राबवित असते. नुकताच रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने स्थानिक तरुण तरुणी यांना रोजगार मिळावा या उद्देशाने २० कंपन्या व त्याचे प्रतिनिधी यांना बोलावून येथील लोणावळा महाविद्यालयात रोजगारमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यामध्ये मैदानी व इतर खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ बी एन पुरंदरे शाळेला रोटरी क्लब लोणावळा व रोटरी क्लब ऑफ निगडी,रोट्रॅक्ट क्लब ऑफ डी वाय.पाटील कॉलेज यांचे तर्फे स्पोर्ट्स किट्स भेट देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष दिलीप पवार आयपीपी रोटरीयन आशिष मेहता,रोटरीयन ऍड मोनाली कुलकर्णी शेलार,रोटरीयन वानखेडे, रो.जयवंत नलोडे,रो. धीरूभाई कल्याणजी तसेच रोट्रॅक क्लब चे पदाधिकारी नायक, अहमद,शिंदे, यादव. आणि शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.




