*भोसरी – कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांचा पुण्यात राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान*

मावळ मराठा न्युज -पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवना मध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात स्पंदन फाऊँडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजात सांस्कृतिक , क्रिडा , पर्यावरण , राजकिय , कला , धार्मिक , आरोग्यविषयक , शैक्षणिक , साहित्यिक , पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय सामाजिक कार्य केल्या मुळे भोसरी- कासारवाडीचे सुपुत्र पैलवान *काळुराम लांडगे* यांना सन्मानिय प्रमुख पाहुणे पुणे येथील श्री.फाउँडेशनचे संस्थापक अध्यक्ष *मा.श्री.सागर उर्फ संदीप पाडाळे ,* पुणे येथील सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर *मा.सौ.प्रणाली देशमुख मॅडम ,* पोलीस इन्स्पेक्टर *मा.सौ.अश्विनी पाटील मॅडम ,* विद्यानिकेतन संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष *मा.श्री.शशिकांत कोचळे सर* यांच्या शुभहस्ते *” स्पंदन राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ “* हा पुरस्कार *सन्मानचिन्ह व सन्मानपत्र* देऊन कासारवाडीचे सुपुत्र पैलवान *काळुराम लांडगे* यांना पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे श्री.शशिकांत कोचळे यांनी आपल्या भाषणात मानवतेच्या सेवेत स्वताःला समर्पित करणे ही केवळ एक कृती नसुन ती एक महान जीवनमुल्य आहे समाजाच्या उन्नतीसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी आपण ज्या निस्वार्थ भावनेने , चिकाटीने आणि अखंड समर्पणाने कार्य केले , ते खरोखरच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे असे विचार सर्वांनच्या समोर मांडले.या कार्यक्रमाच्या वेळी पुरस्कार्थी त्यांचे नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष *श्री.अमर जाधव* व स्पंदन फाऊँडेशन महाराष्ट्र राज्य , संस्थेचे पदाधिकारी , संचालक मंडळ व सभासद वर्ग यांनी भरपुर प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page