डिझाइन आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा उत्सव “कारी-२०२४” १८ ते २० एप्रिल ला शिवाजीनगर येथे आयोजन


मावळ मराठा न्युज पुणे :-एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला,परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया,डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा उत्सव “कारी-२०२४” ला १८ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान, घोले रोड शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे प्रारंभ होत आहे. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी खातनाम गाईका सौ.उषाताई मंगेशकर यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन एमआयटी एडीटीच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचे उद्घाटन आज मंगळवार दि. १६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ वा. राजा रविवर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे, येथे विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाची माहिती पत्रकार मंडळींना देण्यासाठी येथेच पत्रकार परिषद आयोजित केली आहे.या पत्रकार परिषदेला माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्षा सौ.ज्योती ढाकणे, प्रसिद्ध आर्टिस्ट चंद्रमोहन कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, गिरीश दोषी, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.अश्विनी पेठे आदी पत्रकारांशी संवाद साधताना या कार्यक्रमाची माहिती देणार आहेत.




