श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त चिंचवडमध्ये पालखीचे आयोजन



मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) चिंचवड(सुदर्शन नगर) येथील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने १००८ श्री महावीर भगवान जन्मकल्याण महोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नेमीचंद ठोले, कार्याध्यक्ष शीतल पहाडे, सतीश दोशी, शीतल शाह यांनी दिलीदि.२१ एप्रिल रोजी स.७.३० ते ९.30 या वेळेत हि पालखी चिंचवड परिसरातून काढण्यात येईल.आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित पालखी सोहळ्याची सुरुवात सुदर्शन नगर येथील १००८ श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरापासून होईल. दुर्गा कॉर्नर- लिंक रोड- गावडे पेट्रोल पंप- सुदर्शन नगर मार्गे मंदिरात सांगता होईल. या रथयात्रा फेरीत सुमारे तीनशे भाविक सहभागी होणार आहेत.या व्यतिरिक्त मंदिरात स ९ ते ११ अभिषेक, शांतीधारा,सामूहिक पूजन,११:३० वा भगवान महावीरांचा पाळणा, वात्सल्य भोज,१० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, संध्याकाळी महाआरती असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.ट्रस्टच्या माध्यमातून मुलींचे व मुलांचे वसतीगृह तथा अतिथि निवास, समाजातील नवीन पीढ़ी सुसंस्करित करण्या साठी पाठशाला, गरजू नागरीकांसाठी वैद्यकीय व शैक्षणिक मदत आदी उपक्रम करण्यात येतात.




