विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन अक्षय चव्हाण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

मावळ मराठा न्युज :-पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्याचा आनंद द्धिगुणीत केला. गेल्या वर्षापासून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथश्रमात व ममता अंःध कल्याण केंद्रात जाउन त्यांना  स्नेहभोजन व दिवाळी फराळ देऊन  त्याची दिवाळी साजरी चव्हाण. कुटूबिय करत आसतातआपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील  विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला . मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान झाल्याचे अक्षय चव्हाण व ऋतजा जोगदंड-चव्हाण यांनी सांगितले.  आम्ही सर्वानी ही त्यांच्या सोबत स्नेहभोजनचा आनंद घेतला.माझ्या मध्ये हि प्रेरणा माझे वडील आण्णा जोगदंड यांच्या कडून मिळाली लहान पणापासुन मी त्यांच्या कार्य बघत आली आहे मुलांनी आम्हाला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.यावेळी विशेष मुलांनी आपआपला मनोदय व्यक्त करून अर्जुन वाघमोडे या मुलांने वेगवेगळ्या कलाकारांचे व राजकीय व्यक्ती चे आवाज काडून उपस्थित़ाचे मनोरंजन केले.सहकारी प्रथम वर्ग आधिकारी झाल्याचे सांगितले व आम्ही असे अधिकारी होउन प्रशासकीय सेवेत राहून जनसेवा करणार  यांनी सांगितले .आण्णा जोगदंड म्हणाले की शहरातील नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या गरजूंना मदत करुन सामाजिक बांधिलकीतुन आपली माणूसकी दाखवून आपल्याला शक्य तेवढी मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले.यावेळी संस्थेचे संस्थापक तुषार कांबळे म्हणाले आज तुमच्या सारखे नवतरुण मदत करतात आणि त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण होते ही आनंदाची बाब आहे दरवर्षी आम्ही मुलांना प्रेक्षणीय स्थळे पण दाखवतो त्यासाठी दानशूरांनी मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले. शिवाय आण्णा जोगदंड मुळे खूप दानशूर संस्थेशी जोडल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले ,शहरातील दानशूर संस्थांनी व नागरिकांनी मदत करावी असे आव्हान केले.यावेळी ममता अंधः कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड,शहर महिला अध्यक्षा मिना करंजावणे,ऋतजा जोगदंड-चव्हाण, अक्षय चव्हाण, मनोज चव्हाण, वनिता चव्हाण ,श्रेयस जोगदंड, सा.का.लक्ष्मण जोगदंड, संपदा ईतापे,मिरा देशमुख,सतिष ईतापे, जाई जोगदंड, वैशाली आवताडे,पुजा आवताडे, सारीका कांबळे,वैशाली सपकाळ,सारंगी करंजावणे ,मर्जिना नायकवडी,ईत्यादी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page