मावळ लोकसभेतील कर्जत तालुक्यात वादळी वारा पाऊसामुळे वीज खंडित झाली अश्या ठिकाणी फेर मतदान अन्यथा वेळ वाढून द्यावी – श्रीरंग बारणे

मावळ मराठा न्युज :- पुणे,मावळ लोकसभा मतदार संघांचे उमेदवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणुक आयुक्त यांचेकडे वादळी वारा व पाऊस मुळे लाईटचे पोल पडल्याने मतदान केंद्रावर कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करून त्या भागात फेर मतदान घेण्यात यावे अन्यथा वेळ वाढवुन मिळावी अशी मागणी केली आहे श्रीरंग बारणे यांनी केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये वादळी वारा व पाऊस झाल्यामुळे या भागातील लाईटचे पोल पडले व घरावरील पत्रे उडून गेले यामुळे अनेक ठिकाणातील मतदान केंद्रावर लाईट नसल्या कारणाने २ ते ३ तास अनेक नागरीक मतदान करू शकले नाहीत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करून त्या भागात फेर मतदान घेण्यात यावे अन्यथा वेळ वाढवुन मिळावी अशी मागणी निवडणूक आयुक्त यांचे कडे लेखी पत्रद्वारे केली आहे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page