जेष्ठ उद्योगपती रमणलाल लुंकड यांना व्होकेशनल एक्सलन्स सर्व्हिस ॲवार्ड पुरस्कार प्रदान

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,(प्रतिनिधी) रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या झोन २ च्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रमणलाल लुंकड यांना “व्होकेशनल एक्सलन्स सर्व्हिस ॲवार्ड यांना प्रदान करण्यात आला.श्री लुंकड यांनी नाशिक येथील सामन गाव येथे मातोश्री वृद्धाश्रमास स्वखर्चाने एका इमारतीचे बांधकाम केले असून मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगर येथील अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाला स्वखर्चाने एक इमारत बांधून देत आहे. श्री लुंकड यांना जैन समाजाचा अति प्रतिष्ठित भामाशा पुरस्कार, समाजरत्न,चिंतामणी ज्ञानपीठाचा गुरुजन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. या कार्यासाठी त्यांना रोटरीने दिलेला हा पुरस्काराच्या रुपाने त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला. रावेत येथे झालेल्या या कार्यक्रमात रोटरी निगडी क्लबच्या वतीने १४ ट्रिज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण भागवत यांना देखील व्यावसायिक नैपुण्य सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले. रोटरीच्या प्रांतपाल मंजू फडके,प्रांतीय व्होकेशनल संचालक वसंत मालुंजकर, हिरामण बोत्रे, रोटरी क्लब ऑफ़ निगडीचे अध्यक्ष हरबिंदरसिंग दुल्लत, सहाय्यक प्रांतपाल मेहुल परमार, विजय काळभोर,आर के एल ग्रूपचे संचालक रविंद्र लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता राजापूरकर तर आभार हरबिंदर सिंग यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page