शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने ५८ झाडांचे रोपण

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनचे औचित्य साधून ५८ झाडाची लागवड करण्यात आली. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने लोणावळा तलाव परिसरात ५८ वृक्षांचे वृक्षारोपण आज बुधवार १९ जून २०२४ रोजी करण्यात आले.या कार्यक्रमास शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, उपशहर प्रमुख निखिल सोमण, महिला आघाडी शहर संघटिका मनीषाताई भांगरे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, उपशहर संघटिका आयेशा शेख, जयश्री काळे, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर, लोणावळा शहर सोशल मीडिया समन्व्यक नंदू कडू, रेल्वे विभागप्रमुख प्रमोद लोयरे, शाखाप्रमुख प्रसाद कन्नन आदी पदाधिकारी शिवसैनिक वृक्षारोपण कार्यक्रमांस उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page