लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडुन वर्षा विहारा करीता येणा-या पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन

मावळ मराठा न्युज:-लोणावळा, दि.३०/०६/२०२४ रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याचे सुमारास हडपसर पुणे येथील लियाकत अन्सारी व युनुस खान हे त्यांचे १७ ते १८ कुटुंब सदस्यासह वर्षाविहारा करीता लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले असता पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांचे कुटुंबातील एकुण १० जण जोरदार आलेल्या पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले. त्यापैकी ५ जणांना पाण्याचे प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आले परंतु उर्वरीत ५ जण पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले असुन त्यांचे पैकी तिघांचे मृतदेह मिळुन आले असुन त्यांची नावे १) साहिस्ता लियाकत अन्सारी वय ३७ वर्ष २) अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय १३ वर्ष ३) उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय ८ वर्ष सर्व रा. सय्यदनगर पुणे. तसेच पाण्याचे प्रवाहात वाहुन गेलेले अदनान अन्सारी व मारिया अन्सारी यांचा शिवदुर्ग मित्र मंडळ व आय.एन. शिवाजी यांचे मदतीने शोध कार्य सुरु आहे. सदरचा परिसर हा भारतीय रेल्वे विभाग व भारतीय वन खाते यांचे आखरित्यात असल्याने रेल्वे प्रशासन, वन विभाग व नगर पालिका यांचे मदतीने सदर ठिकाणी योग्य त्या उपाय योजना करण्यात येत आहेत.याद्वारे तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहारा करीता येणा-या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालु नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात वर्षाविहारा करीता येणारे पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहारा करीता येणा-या पर्यटकांनी आपली व आपले कुटुंबाची योग्य ती काळजी घेवुन वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालु नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे वतीने करण्यात आलेआहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page