संत सावता महाराज समाधीस्थळ अरण तीर्थक्षेत्राचा त्वरित विकास आराखडा तयार करावा,ट्रस्टने केली फडणवीस यांच्याकडे मागणी


मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) अरण स्थित (ता माढा, जि सोलापूर) येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी स्थळ तीर्थक्षेत्राचा त्वरित विकास आराखडा तयार करावा या मागणीसाठी संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शिस्ट मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून चर्चा केली. या पिंपरी चिंचवड शहरातील शिष्टमंडळात संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सावता महाराज वसेकर, सचिव प्रभू महाराज माळी, विश्वस्त साखरचंद महाराज लोखंडे, अमित जावळे,गणेश जांभूळकर यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणूकीची धावपळ असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच सुमारे अर्धा तास चर्चा केली. असता त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. या कार्यासाठी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,खा डॉ अमोल कोल्हे,आ.जयकुमार गोरे,आमदार देवयानी फरांदे,आ योगेश टिळेकर, उद्योजक अनिल जाधव यांनी देखील शिष्टमंडळाला वेळोवेळी सहकार्य केले. यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे सागर बंगला या ठिकाणी भेट घेतली असता, लवकरच हा विषय मार्गी लावला जाईल. असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या मागण्या पुढीलप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम समाजबांधवांचे दैवत असलेले संत सावता महाराजांच्या संजीवन समाधी स्थळाला राज्यभरातील भाविक भेट देत असतात. अराण येथील संत सावता महाराज मंदिराचा जीर्णोद्धार, भक्त निवास, अन्न क्षेत्र, आरोग्यकेंद्र,बस स्थानक, मुबलक पाणी उपलब्धता, संत सावता महाराज अभंग वाड्मय व आयुर्वेदीक संशोधन केंद्राची उभारणी करण्यात यावीत, हि मागणी गेली ६ महिन्यापासून करीत आहे.




