निसर्गोपचार वनऔषधी,सात्विक आहार,रसाहारकरत १५० रुग्णांनी आरोग्य शिबिरात घेतला सहभाग

मावळ मराठा न्युज :-पुणे,निसर्गोपचार वनऔषधी, सात्विक आहार,रसाहार द्वारे शिबिराचा २० सप्टेंबर २०२४ ला सुरू झालेल्या शिबिराचा समारोप २६ सप्टेंबर २०२४ ला सकाळी १० वाजता झाला. या शिबिरामध्ये रुग्णांना निसर्ग उपचार , वन सात्विक आहार,रसाहार द्वारे उपचार करून १५० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेऊन सात दिवसांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर ,वजन, तणावमुक्ती साध्य केली.या शिबिरामध्ये ग्रामीण, शहरी गरजू विद्यार्थ्यांना वनौषधी, निसर्गोपचार, मसाज, मडथेरेपी, ॲक्युप्रेशर प्रशिक्षण देण्यात आले. जेणेकरून गावागावात सहज उपचार करू शकतील. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन करण्याकरता डॉक्टर शिंगेवाडीकर विश्वेश्वर योग मंदिर,शिंगेवाडीकर आयुर्वेद, सन्माननीय वैद्य गुरुजी विष्णु भोसले संस्थापक, मेरा गाव मेरा वैद्य,नांदेड आणि डॉक्टर प्रमोद माळवे इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, सायन्स अँड रिसर्च (INHSR )नागपूर हे होते.या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शुभांगी उमेश सरोटे, डॉ. मीनाक्षी मालविया नागपूर, डॉ. ज्योती सचिन वारूडे(टिटवाळा) (दिव्यज्योत योग व प्राकृतिक चिकित्सा केंद्र) मुंबई, देविदास वाघमोडे नैसर्गिक शेती प्रचारक , प्रकाशजी साळुंखे चैतन्यनाद स्पर्श संस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अविनाश जाधव, डॉक्टर अनिल विजयकर, बसवन्ना मेहत्रे, चेतन एकोणकर,दिनेश मोरे,प्रियंका देवकाते, कु. आरती पाटील, अरुणा येडके, वैष्णवी अंगितकर, विद्या बटवाल ,सौ मीनाक्षी मिसाळ, सौ.संगीता गायकवाड, सौ. माया जाधव, कू.भाग्यश्री कोल्हे, विशाल साळुंखे, गणेश बोराडे, सचिन आखाडे या सर्वांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदना ने करण्यात आली. आखाडे या सर्वांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदना ने करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page