भाजप लोणावळा शहर आणि मावळ तालुक्याचे वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त रक्तदान शिबीर

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी मावळ तालुका व लोणावळा शहर यांच्या वतीने आणि दीनानाथ मंगेशकर ब्लड बँक यांच्या सहयोगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोणावळा नगरपरिषद इमारतीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असे भाजप शहर अध्यक्ष अरुण लाड यांनी एम एन न्युज शी बोलताना सांगितले. या शिबिरात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे,मावळ तालुका भाजपा अध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,देविदास कडू,आशिष बुटाला,अर्जुन पाठारे, हर्षल होगले,शुभम मानकामे, प्रफुल्ल काकडे,श्रवण चिकणे, बाबू संपत,कांचन गायकवाड, प्रथमेश पाळेकर,प्रफुल काकडे,संकेत निकुडे,जयप्रकाश परदेशी,परिजा भिल्लारे, योगिता कोकरे, ज्ञानेश्वर गुंड, चंद्रकांत गाडे, विजया वाळंज, आदिती होगले, पद्मा संपत,रुपेश नांदवटे,संदीप पोटफोडे,रमेश गायकवाड,नंदू जोशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page