अनिका पिकॅडिली मध्ये ध्वजारोहण उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्यूज -पुनावळे पुणे,-स्वतंत्र भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन अनिका पिकॅडिली या वैशिष्ट्यपूर्ण सोसायटीत सोसायटी कार्यकारिणी सदस्य आणि रहिवासी नागरिकांतर्फे पूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार श्री. बाबू डिसोजा कुमठेकर यांना मान देत तरूण पिढीतर्फे बोलावूनत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत समूह गायनानंतर लहान मुलांना टॉफी, चॉकलेट वाटप करण्यात आले. उपस्थित सोसायटी सदस्यांना अल्पोपहार देण्यात आला.




