वडगांव मावळ येथे मे. न्यायाधीश सो यांचा निरोप समारंभ संपन्न




मावळ मराठा न्युज :-वडगांव,वडगांव मावळ येथील में. न्यायाधीश सी. आर. उमरेडकर सो, एस. जे. कातकर सो, एस. आर. बर्गे सो यांची विविध ठिकाणी बदली झाल्यामुळे वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने नुकताच निरोप समारंभ कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला. में. न्यायाधीश सो यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विवीध वकीलानी आपले मनोगत व्यक्त करून मे. न्यायाधीश सो याना शुभेच्या देण्यात आल्या. यावेळी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स संघटनेचे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे , उपाध्यक्ष ऍड मोनाली कुलकर्णी शेलार, सचिव ऍड प्रनोती पिंगळे, ॲड अक्षय रौंधल, ऍड अजित वहीले, ॲड राम शहाणे, ॲड स्वामी फुगे ,ॲड सारिका पिंजन आदी उपस्थित होते.




