श्रीमद् सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर संस्थेतील बारा विद्यार्थी संगीत विशारद (तबला)या परीक्षेत प्रथम श्रेणित मध्ये उत्तीर्ण

मावळ मराठा न्युज -मारणेवाडी,ता. मुळशी येथील श्रीमद् सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर या संस्थेतील बारा विद्यार्थी संगीत विशारद ( तबला ) या परीक्षेत प्रथम श्रेणित मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील व मुळशी तालुक्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत संगीताचे व अध्यात्माचे धडे मिळावेत व संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने सुप्रसिद्ध कीर्तनकार व शास्त्रीय गायक ह. भ. प. डॉ. विजय महाराज जगताप यांनी श्रीमद् सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर ही संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे मुलांना मोफत शिक्षण दिले जाते, तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाद्ये पुरवणे, शालेय शिक्षणासाठी मदत करणे, याचबरोबर गीता पठण, नामस्मरण व इतर अध्यात्मिक शिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये सध्या १२५ पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व या विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण ह. भ. प. गुरुवर्य श्री. जानकीराम जगताप व आघाडीचे युवा तबलावादक श्री. ऋषिकेश दादा जगताप हे देत आहेत. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या विद्यापीठाचे संगीत विभागाचे अधिकृत केंद्र मारणेवाडी येथे घेतलेले असून विद्यापीठामार्फत नोव्हेंबर २०२४ महिन्यात घेतलेल्या संगीत विशारद पूर्णच्या परीक्षांमध्ये या संस्थेच्या बारा विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन व फर्स्ट क्लास अश्या ग्रेड मिळवून विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. विशारद झालेल्या मुलांपैकी बहुतांश ग्रामीण भागातील मुलांनी इ. दहावीमध्ये ८५% ते ९८% पर्यंत गुण मिळविलेले आहेत व उरलेले तीन विद्यार्थी इ. नववी व दहावीमध्ये शिकत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात पुढील प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. मुळशी तालुक्यातील खेड्यामध्ये असलेले हे विद्यार्थी घरची व शेतातील सर्व कामे सांभाळून शालेय शिक्षणाबरोबर संगीताचे शिक्षण घेत असून त्यांनी कमी वयातच मिळवलेली “तबला विशारद” पूर्ण ही पदवी म्हणजे मुळशी तालुक्यातील हे पाहिले यश असून कौतुकास्पद व अभिमानास्पद ठरले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page